अजयच्या ‘बादशाहो’चे पहिले गाणे प्रदर्शित

81

सामना ऑनलाईन । मुंबई

सुफी संगीताची परंपरा आणि प्रेक्षकांची या गाण्यांना मिळणारी पसंती पाहता श्रोत्यांसाठी आणखी एक पर्वणी असणारे इलियाना डिक्रूझ आणि अजय देवगण यांच्या आगामी ‘बादशाहो’ या चित्रपटातील गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. काही वर्षांपूर्वी सुफीयाना आवाजाने नुसरत फतेह अली खान यांच्या गाण्याचे हे सुरेख रिक्रिएटेड व्हर्जन आहे.

या गाण्यातून आपल्याला इलियाना डिक्रूझ आणि अजय देवगण यांची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. अजय देवगण ‘जुबान और जान सिर्फ एक ही बार दी जा सकती है’, असे म्हणत पुन्हा एकदा नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘मेरे रश्के कमर’ या गाण्यात राजेशाही थाट, प्रेम, आर्तता आणि त्यातून या दोघांचे खुलणारे प्रेम या सर्व गोष्टींचा मेळ साधण्यात आला आहे.

मनोज मुंतशिर याने हे गाणे लिहिले असून या गाण्यात प्रसिद्ध सुफी गायक नुसरत फतेह अली खान आणि राहत फतेह अली खान यांच्या आवाजाने ‘चार चाँद’ लावत आहेत. या दिवसांमध्ये रिक्रिएटेड व्हर्जन्स चर्चेत असणाऱ्या तनिष्क बागचीने या गाण्याचा मूळ आत्मा जपतच ते सादर केले आहे. ‘बादशाहो’ चित्रपट अॅक्शन थ्रिलर या प्रकारात मोडत असून अजय देवगण, इमरान हाश्मी, इलियाना डिक्रूझ, इशा गुप्ता आणि विद्युत जामवाल हे कलाकार यात झळकणार आहेत.

पाहा गाण्याचा व्हिडिओ-

आपली प्रतिक्रिया द्या