भय इथले संपत नाही; जशन भूमकर याचे नवे गाणे

युवा गायक जशन भूमकर ‘भय इथले संपत नाही’ या गीताचे नवे व्हर्जन घेऊन रसिकांच्या भेटीला आला आहे. सध्याच्या कोरोना संकटात आपल्यापैकी अनेकांनी काही ना काही गमावले आहे. ज्यांची आठवण आपल्याला सदैव येत राहील, अशा सर्व लोकांना जशनने हे गाणे समर्पित केले आहे.

‘भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते, मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवलेली गीते…’ ही कवी ग्रेस यांची कविता. मूळ गाणे ज्येष्ठ पार्श्वगायिका लता मंगेशकर यांनी गायलेले असून त्याला पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिलेले आहे. काही वर्षांपूर्वी हे गीत प्रकाशित करणाऱया फाऊंटन म्युझिकने आता जशन भूमकरच्या आवाजात हे गीत नव्याने रसिकांसमोर आणले आहे. याविषयी जशन म्हणतो, ‘‘एक संवेदनशील कलाकार आपल्या आजूबाजूच्या वातावरणापासून अलिप्त राहू शकत नाही. सध्याच्या कोरोना संकटात ज्यांनी काही ना काही गमावलेय, त्या सर्वांना हे गीत समर्पित करत आहे. कदाचित त्या काळी हे गाणे लिहिताना कवी ग्रेस यांच्याही अशाच भावना असाव्यात.’’

आपली प्रतिक्रिया द्या