श्री सप्तशृंग देवी ट्रस्टच्या पाच विश्वस्तांची नियुक्ती; अॅड. पाटोदकर यांचा समावेश

स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंग गड येथील श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या पाच विश्वस्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात नाशिकच्या अॅड. दीपक पाटोदकर यांचा समावेश आहे. श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाची मुदत संपल्याने पुढील पाच वर्षांसाठी नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीकरिता प्रक्रिया राबविण्यात आली. यासाठी जिल्ह्यातील पात्र उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले होते. त्यांच्या 21 ते 25 सप्टेंबर या कालावधीत मुलाखती घेण्यात आल्या. त्यातून नव्या पाच विश्वस्तांच्या नावांची घोषणा ट्रस्टचे पदसिद्ध अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवसे यांनी केली आहे. या नव्या विश्वस्तांमध्ये नाशिक येथील अॅड. दीपक पाटोदकर, मनज्योत पाटील, डॉ. प्रशांत देवरे, भूषणराज तळेकर आणि कळवण येथील अॅड. ललित निकम यांचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या