येसूबाई करणार शंभूराजांचं स्वागत

580

सामना ऑनलाईन । मुंबई

शूर आबासाहेबांचे शूर छावे शंभूराजे मोठ्या रुपात पडद्यावर अवरतले आणि प्रेक्षकांची अनेक दिवसांची प्रतीक्षा संपली. मोठ्या रुपातील शंभूराजांचा पराक्रम आणि बुद्धिचातुर्याचे अनेक दाखले आपण स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत पाहाणार आहोतच. शंभूराजांचे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीशी असणारे बंध उलगडून दाखवताना त्यांच्या खाजगी आयुष्यातील नातेसंबंधावरही या मालिकेतून प्रकाश टाकाला जातोय.

कय्युमखानावर विजय मिळवून आलेल्या शंभूराजांचं स्वागत येसूबाई कसं करणार याचीही एक निराळी उत्सुकता आहे. शंभूराजांनी लिहिलेला बुधभूषण ग्रंथ येसूबाईंच्या हाती लागतो. त्याच्या उत्सुकतेपोटी त्या दरबारात या ग्रंथाचं वाचन ठेवतात. याचदरम्यान अणाजी आणि शंभूराजेंमध्ये मतभेदाची ठिणगी पडते आणि नव्या राजकारणाची सुरुवात होते. येसूबाई आणि शंभूराजांची पहिली भेट आणि स्वराज्यातल्या नव्या राजकीय गणितांची सुरुवात अशा अनेक घडामोडी येत्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहेत.

येसूबाई आणि शंभूराजे या पती पत्नीच्या प्रगल्भ नात्याचे वेगळे पदर या मालिकेच्या निमित्ताने उलगडले जाणार आहेत. पराक्रम आणि बुद्धिचातुर्याचं  देणं शंभूराजांना जन्मत:च मिळालं होतं. पण व्यक्ती केवळ त्याच्या पराक्रमाने श्रेष्ठ ठरत नसते तर त्याच्यातल्या माणूसपणा, नेत्याचं श्रेष्ठत्व अमर होतं. शंभूराजांची ही गाथा केवळ त्यांच्या पराक्रमाचा इतिहास नव्हे तर त्यांच्यातल्या सद्सद्विवेकी, कुटुंबवत्सल माणसाची आणि न्यायी राजाची ही कथा आहे. इतिहास रचतानाही माणूसपण जपणाऱ्या शंभूराजांच्या गाथेचे अनेक पदर येत्या भागांत या मालिकेतून उलगडले जाणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या