खूषखबर, हिंदुस्थानींसाठी ट्विटर झालं ‘लाईट’

21
सामना ऑनलाईन । मुंबई
अवघ्या १४० अक्षरांत व्यक्त होण्याची संधी देऊन लोकप्रिय झालेल्या ट्विटर या सोशल नेटवर्कने हिंदुस्थानमधील स्मार्टफोन आणि टॅब्लेट युझरसाठी ट्विटर लाईट हे अॅप आणले आहे. ट्विटर लाईट हे अॅप युझर फ्रेंडली आहे. या अॅपमुळे युझरचा ७० टक्के डेटा वाचणार आहे आणि अपलोड करण्याचा वेग ३० टक्क्यांनी वाढणार आहे. ट्विटर लाईट हे अॅप ब्राउजरवर आधारित असून अॅप स्टोअर वा गुगल प्ले अकाउंटची या सेवेसाठी आवश्यकता नाही. हिंदी, मराठी, बंगाली, कन्नड, तमिळ, गुजराती या सहा हिंदुस्थानी भाषांसह ४२ भाषांमध्ये ट्विटर लाइट उपलब्ध असणार आहे.
ट्विटर लाइटची वैशिष्ट्ये:
– हे प्रोग्रेसिव्ह वेब अॅप गुगलच्या सहकार्याने बनवण्यात आलं आहे.
– डायरेक्ट मेसेज, सर्च बटण, फीड यासह अँड्रॉइड मोबाइलवर नोटिफिकेशन पाठवण्यासाठी खास फिचर.
– मोबाइल आणि डेस्कस्टॉपवरही हे अॅप वापरता येईल.
mobile.twitter.com या साइटवर तुम्हाला लॉगइन करावं लागेल.
आपली प्रतिक्रिया द्या