पिनाका युद्धाच्या मैदानात शत्रूला सळो की पळो करणारे स्वदेशी बनावटीचे घातक एयर सिस्टीमचे तिसरे मॉडेल साकार होत आहे. ‘पिनाका- एमके3’ असे त्याचे नाव आहे. या एयर डिफेन्स फॅब्रिकेशनचे काम सुरू आहे. या रॉकेट लाँचरमुळे हिंदुस्थानची मारक क्षमता खूप पटीने वाढणार आहे.
डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) जवानांच्या हाती ‘पिनाका- एमके3’ देणार आहे. या एअर डिफेन्स सिस्टीमच्या माध्यमातून आपले जवान आसमंतातील संकट असो किंवा दुरून होणाऱया शत्रूच्या प्रत्येक हालचालीचा जवाब द्यायला आणखी मजबूत होतील. ‘पिनाका- एमके3’च्या मदतीने दूरपर्यंतची अॅटॅक करता येईल.
‘पिनाकाचा उपयोग कारगिल युद्धात करण्यात आला होता. आता पिनाका रॉकेट लाँचरचे अद्ययावत व्हर्जन येतंय. कारगीलच्या युद्धात पिनाकाच्या कामगिरीने शत्रूला धडकी भरली होती. ‘पिनाका- एमके3’ चे दोन वेरियंट बनवले जातील. पिनाका-एमके3 ला खास युद्धासाठी तयार करण्यात आले आहे. याचा वापर करण्यासाठी कमी सैन्य लागेल. हिंदुस्थानकडे पिनाका रॉकेट लाँचर सिस्टिमचे अनेक व्हर्जन आहे. ज्यात पिनाका एमके-1, एमके-आय एनहान्स्ड आणि पिनाका एमके-2 आहे. पिनाका एमके-1 ची रेंज 48 किमी, पिनाका एमके-आय एनहान्स्डची रेंज 60 किमी आणि पिनाका एमके-2ची रेंज 90 किमी आहे.
पिनाकाचे दोन व्हेरियंट बनवणार
पिनाका एमके 3 चे दोन व्हेरियंट बनवले जाणार आहेत. लाँग रेंज गाईडेड रॉकेट सिस्टिम असून याची रेंज 120 किलोमीटर किंवा त्यापेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या व्हेरियंटची रेंज 300 किलोमीटर असेल. या रॉकेट
लाँचरची स्पीड 5757.70 किमी प्रति तास असेल.
पिनाकाचा कारगिल युद्धात वापर झाला होता. परंतु, आता हे नवीन व्हर्जन येणार आहे. ते पिनाका रॉकेट लाँचरचे अत्याधुनिक व्हर्जन असणार आहे. पिनाकाने कारगिल युद्धात पाकिस्तानात बसलेल्या शत्रूंचे कंबरडे मोडले होते.