कलाकारांपासून तंत्रज्ञांपर्यंत… सबकुछ महिला! ‘हश-हश’ वेबसीरिजमधून भन्नाट प्रयोग

अभिनेत्रींपासून कॅमेऱयामागे काम करणाऱया तंत्रज्ञापर्यंत, अगदी दिग्दर्शक आणि लेखन अशी सारीच जबाबदारी महिलांनी सांभाळलेली नवी वेबसीरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘हश- हश’ या वेबसीरिजच्या माध्यमातून हा भन्नाट प्रयोग होत आहे.

अभिनेत्री जुही चावला आणि आयेशा जुल्का ‘हश- हश’ या वेबसीरिजच्या माध्यमातून ओटीटी मंचावर आल्या आहेत. त्यांच्यासोबत कृतिका कामरा, करिश्मा तन्ना, सोहा अली खान, शहाना गोस्वामी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या वेबसीरिजचे वैशिष्टय़ म्हणजे यामध्ये सर्व महिला कलाकार आणि महिला तंत्रज्ञांची फौज आहे.

तनुजा चंद्रा या मालिकेच्या क्रिएटिव्ह डायरेक्टर, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत. शिखा शर्मा या मूळ कथा लेखिका, जुही चतुर्वेदी संवाद लेखन तर कोपल नाथानी या एपिसोड डायरेक्टर आहेत. या अनोख्या प्रयोगाविषयी बोलताना तनुजा चंद्रा म्हणाल्या, ‘हश- हश’ ही स्त्रियांच्या नजरेतून, त्यांच्या आत्मकथनातून उलगडणारा कहाणी आहे. हिंदुस्थानात व्हिडीयो स्ट्रिमिंगने महिलांच्या कथेला जास्तीत जास्त प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे. माझ्यासारख्या दिग्दर्शकांनी या बदलाची दीर्घकाळ वाट बघितली आहे. ऍमेझॉन प्राईम व्हिडीयोवर ही वेबसीरिज बघता येईल.

आपली प्रतिक्रिया द्या