सलमान खानची न्यू ईयर पार्टी पुन्हा चर्चेत, खास सेलिब्रिटींची उपस्थिती

1297
salman-khan

बॉलीवूड सेलिब्रिटीकडून नवं वर्षाचं स्वागत अगदी जोशात करण्यात येतं. यंदाही असाच जोश-जल्लोश पाहायला मिळाला. या सगळ्यात सर्वाधिक चर्चा असते ती अभिनेता सलखान खान याच्या पार्टीची. सलमानच्या पनवेलमधील फार्म हाऊसवर ही पार्टी रंगते. यंदा संगीता बिजलानी या कार्यक्रमासाठी हजर असल्याचे सांगण्यात येते.

नवं वर्षाचं स्वागत करण्यासाठी आलेल्या पाहुण्यांच्या यादीत सलमान खानची पूर्वीची मैत्रिण संगीता बिजलानी दिसल्याने साऱ्यांच्या भुवया उंचावल्या. त्यांचे काही फोटो व्हायरल झाले असून सलमान खानच्या हातात कॉफीचा मग असल्याचा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे.

संगीता बिजलानीसोबत डेजी शाह आणि साजिद नाडियाडवाला देखील त्याची पत्नी वर्धा नाडियाडवाला देखील या कार्यक्रमावेळी उपस्थित होती. तसेच सोहेल खानचा मुलगा निरवान खान आणि त्याचे मित्र देखील या ठिकाणी उपस्थित होते.

पनवेलच्या रस्त्यांवर निरवान खान आणि त्याचे मित्र ओपन जीपमधून फिरताना पाहायला मिळाले.

आपली प्रतिक्रिया द्या