नवीन वर्षात सिंधूचे ‘नंबर वन’चे लक्ष्य

31

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

यंदाचे २०१७ हे वर्ष हिंदुस्थानी बॅडमिंटनपटूंसाठी खऱ्या अर्थाने यशाचे ठरले. किदाम्बी श्रीकांत, एच. एस. प्रणॉय, साई प्रणीत, सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू या खेळाडूंनी सुपरसीरिज स्पर्धांमध्ये प्रभावी कामगिरी करत जागतिक क्रमवारीत टॉप-१० मध्ये प्रवेश केला. मात्र आगामी २०१८ या वर्षांत ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने जागतिक क्रमकारीत ‘नंबर वन’च्या सिंहासनावर विराजमान होण्याचा संकल्प केला आहे. नवी दिल्लीत प्रीमिअर बॅडमिंटन लीगचा सामना झाल्यानंतर सिंधू पत्रकारांशी बोलत होती. आगामी वर्षात अव्वल स्थान काबीज करण्याचा माझा निर्धार आहे. सध्या मी जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे आगामी वर्षात मी किती स्पर्धांमध्ये सहभागी होते यावर माझे पहिले स्थान अवलंबून असेल. त्यामुळे रँकिंगचा विचार मनात न ठेवता मी फक्त माझ्या खेळावर लक्ष केंद्रित करणार आहे. जर मी सातत्यपूर्ण कामगिरी केली तर आपोआपच मी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान होईन, असेही सिंधू म्हणाली.

आपली प्रतिक्रिया द्या