थंडी फर्स्ट! नव्या वर्षाच्या स्वागताला मस्त गारवा

सामना प्रतिनिधी । मुंबई

वर्ष सरता सरता का होईना, पण महाराष्ट्रात चांगलीच थंडी पडली. जम्मू-कश्मीर आणि हिमाचल प्रदेशात सध्या जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. तेथून वाहणारे थंड वारे महाराष्ट्रात पोहचल्यामुळे राज्यभरात थंडीची अक्षरश: लाट पसरली आहे. नागपूर, गोंदियाचा पारा ९ डिग्रीपर्यंत घसरला आहे. त्यामुळे अनेक शहरांत हाडे गोठवणारी थंडी पडली आहे. मुंबईचा पाराही १७ डिग्रीपर्यंत खाली आला असून रात्री आणि पहाटेच्या वेळी मुंबईकरांना हुडहुडी भरत आहे. ही थंडी थर्टी फर्स्टपर्यंत राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

जितकी जुनी दारू तितकी नशा जास्त… त्यामुळे गेल्या २० वर्षांपासून घरात पेटी पॅक ठेवलेली टीचर आणि ब्लॅक डॉग यंदा बाहेर काढणार असे विक्रोळीच्या नितीन साळवी यांनी सांगितले. या वर्षीची आमची पार्टी नेरळमध्ये करणार असे त्यांनी सांगितले. आतापासूनच थंडीचा अनुभव घेतोय. थर्टी फर्स्टला अशीच थंडी राहिली तर नव्या ग्लासातली जुनी दारू आणखी नशिली होईल असे भांडुपच्या निशांत केणी यांनी सांगितले.

धुरक्याची चादर विरली

मुंबईचा पाराही १७ डिग्रीपर्यंत खाली आला असून रात्री आणि पहाटेच्या वेळी मुंबईकरांना हुडहुडी भरत आहे. ही थंडी थर्टी फर्स्टपर्यंत राहाणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान, मुंबईवर गेल्या काही दिवसांपासून आलेली धुरक्याची चादर विरळ झाली असल्यामुळे मुंबईकर या थंडीचा मनमुराद आनंद घेताना दिसत आहेत. जॉगिंग ट्रक गर्दीने फुलून गेल्याचे चित्र सध्या मुंबईसह उपनगरांमध्ये दिसत आहे.

आग, बाटली आणि आठवणी

यंदाच्या थर्टी फर्स्टला आम्ही पाचगणीच्या पठारावर थर्टी फर्स्ट साजरा करण्याचा प्लॅन करत आहोत. मध्ये पेटवलेली आग… सभोवताली कोंडाळे करून बसलेले आणि खूप वर्षांनी भेटलेले मित्र..जोडीला गोड आणि कटू आठवणी…आणि बोचरी थंडी… वा…क्या बात है..! यंदाचा थर्टी फर्स्ट कायमची आठवण देणारा असेल असे बोरिवलीच्या उमेश कुरणे यांनी सांगितले.

राज्यातला पारा
धाराशीव  ०.८
नागपूर  ०.९
गोंदिया  ०.९
बीड  १०
परभणी  १२
चंद्रपूर  १२
जळगाव  १३
संभाजीनगर  १४
नाशिक  १४

पारा आणखी घसरणार

मुंबईसह राज्यभरात तापमानाचा पारा आणखी घसरणार आहे. त्यामुळे थंडीचा कडाका आणखी वाढणार असल्याचे स्कायमेटच्या महेश पलावत यांनी सांगितले. राज्यात आता खऱया अर्थाने थंडी पडायला सुरुवात झाली असून ही थंडी आणखी काही दिवस मुक्काम ठोकणार आहे. त्यामुळे थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन थंडीच्या आल्हाददायक वातावरणात जोरदार होणार आहे.

धुरक्याची चादर विरली

ही थंडी थर्टी फर्स्टपर्यंत राहाणार असून जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातील बर्फवृष्टीही आणखी वाढणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान, मुंबईवर गेल्या काही दिवसांपासून मुंबईवरची धुरक्याची चादर विरळ झाली आहे. त्यामुळे मुंबईकर या थंडीचा मनमुराद आनंद घेताना दिसत आहेत.