पर्यटकांनी बहरले महाबळेश्वर

सामना प्रतिनिधी । महाबळेश्वर

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नववर्षाचे स्वागत करण्यासाठी महाबळेश्वरमध्ये पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. महाबळेश्वरमधील प्रसिद्ध वेण्णा तलावावर नौकाविहार करण्यासाठी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. त्याशिवाय पर्यटकांसाठी महाबळेश्वरमधील बाजारपेठाही रंगल्या असून तेथे खास विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.