स्टेट बँकेचे ‘न्यू इअर गिफ्ट’; गृहकर्ज आणखी स्वस्त होणार

560
sbi-poster

देशाची आघाडीची बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्या ग्राहकांना व्याजदर कपातीचे ‘गिफ्ट’ देणार आहे. गृहकर्जावरील व्याजदर 8 टक्क्यांच्या खाली आणला जाईल अशी माहिती बँकेचे व्यवस्थापकीय संचालक (रिटेल आणि डिजिटल बँकिंग) पी. के. गुप्ता यांनी गुरुवारी दिली. 1 जानेवारीपासून गृहकर्जांबरोबरच इतर सर्व कर्जे रेपो रेटशी लिंक केली जाणार आहेत. त्यामुळे कर्जाची वेळीच परतफेड करणाऱ्या ‘बेस्ट कस्टमर्स’ना आठ टक्क्यांपेक्षा कमी व्याजदराने गृहकर्ज मिळू शकते. हा व्याजदर 7.90 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे स्टेट बँकेने ठरवले आहे, असे गुप्ता यांनी या वेळी स्पष्ट केले. सध्या स्टेट बँकेच्या गृहकर्जाचा किमान व्याजदर 8.15 टक्के इतका आहे.

आपली प्रतिक्रिया द्या