
जगभरातील कोट्यधीश व्यक्ती राहण्यासाठी आणि गुंतवणुकीसाठी कोणत्या शहराला पसंती देत आहेत. यासंबंधीचा एक अहवाल हेनले अँड पार्टनर्सने न्यू वर्ल्ड वेल्थसोबत मिळून प्रसिद्ध केला आहे. या यादीनुसार, न्यूयॉर्क शहराला सर्वात जास्त पसंती मिळाली असून या शहरात तब्बल 3 लाख 84 हजार 500 कोट्यधीश आहेत. या कोट्यधीशांची संपत्ती 100 मिलियन डॉलरहून अधिक आहे. तसेच 66 अब्जाधीशांसोबत जगातील सर्वात श्रीमंत शहर बनले आहे. या शहरात सर्वात पॉवरफुल फायनान्स इंडस्ट्रीज, रियल स्टेट मार्केट आणि उद्योगपती राहत आहेत.
सिलिकॉन व्हॅली आणि सॅन फ्रान्सिस्को या शहरांना दुसरे स्थान मिळाले आहे. या ठिकाणी 3 लाख 5 हजार 700 कोट्यधीश राहतात. जपानच्या टोकियो शहरात 2 लाख 98 हजार 300 कोट्यधीश राहतात. सिंगापूरमध्ये 2 लाख 44 हजार 800 कोट्यधीश राहत असून 30 अब्जाधीश राहत आहेत. लॉस एंजिल्समध्ये 43 अब्जाधीशांसोबत 516 कोट्यधीश राहत आहेत.
लंडन शहरात 15 टक्के घसरण
गेल्या दहा वर्षांत लंडन शहरात राहणाऱ्या श्रीमंत लोकांच्या संख्येत 15 टक्के घसरण झाली आहे. या ठिकाणी आता 2 लाख 27 हजार कोट्यधीश राहतात. पॅरिसमध्ये 1 लाख 65 हजार कोट्यधीश राहत असून युरोपमधील हे शहर सर्वात श्रीमंत शहर आहे. या शहरात फॅशन, कल्चर आणि व्यापारी मोठ्या प्रमाणात राहतात. हाँगकाँगमध्ये 1 लाख 54 हजार, सिडनीत 1 लाख 52 हजार 900 कोट्यधीश, तर शिकागोत 1 लाख 27 हजार 100 कोट्यधीश राहतात.
10 प्रमुख शहरे
- न्यूयॉर्क
- सॅन फ्रान्सिस्को
- टोकियो
- सिंगापूर
- लॉज एंजिल्स
- लंडन
- पॅरिस
- हाँगकाँग
- सिडनी
- शिकागो