‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर झळकल्या हिंदुस्थानी गायिका

हिंदुस्थानी गायिका सुनिधी चौहान आणि शाल्मली खोलगडे या दोघींनी समस्त देशवासीयांना अभिमान वाटावा अशी कामगिरी केली आहे. दोघींच्या ‘हिजर इज ब्युटीफूल’ या गाण्याची भुरळ परदेशातील संगीतप्रेमींना पडली आहे. हे गाणे मोठय़ा प्रमाणात व्हायरल होत असून लोकांच्या पसंतीस पडत आहे. या गीताची लोकप्रियता बघून न्यूयॉर्कमधील मॅनहॅटनजवळील ‘टाइम्स स्क्वेर बिलबोर्ड’च्या स्क्रीनवर सुनिधी आणि शाल्मली यांचे पोस्टर झळकले आहे. याबद्दल दोघींवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सुनिधी आणि शाल्मली ही स्पोटीफाय इक्वल या जागतिक स्तरावरील संगीतमय कार्यक्रमात भाग घेणारी एकमेव हिंदुस्थानी जोडी आहे. गायिकांच्या हक्कांसाठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आवाज उठवला जाणार आहे. इन्स्टाग्रामवर ही आनंदवार्ता शेअर करत शाल्मलीने लिहिलंय, आजूबाजूला दुःख, वेदना, हानी आहे. त्यामुळे आनंद साजरा करण्याची ही वेळ नाही. ‘टाइम्स स्वेअर बिलबोर्ड’वर माझा चेहरा कधी काळी झळकेल, असं मी स्वप्नातही पाहिलं नव्हते. मी आता इंग्लिश गाण्याची सुरुवात केली आहे. खूप पुढे जायचं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या