
बांगलादेशने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला फलंदाजीची संधी दिली, पण 5 बाद 136 या धावसंख्येवर असताना पावसाने अडथळा आणला आणि सामना तेथेच थांबला. अखेर हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. या सामन्यात न्यूझीलंड 2 बाद 16 अशा स्थितीत होता. मात्र त्यानंतर विल यंग आणि हेन्री निकोल्स यांनी दमदार आणि शानदार खेळ करत तिसऱया विकेटसाठी 97 धावांची भागी केली. मुस्तफिझूरनेच ही जोडी फोडली.