न्यूझीलंडने उडवला हिंदुस्थानचा धुव्वा

28

सामना ऑनलाईन । प्यूककोहे

हिंदुस्थानच्या महिला हॉकी संघाला येथे झालेल्या पहिल्या सामन्यात यजमान न्यूझीलंडकडून ४-१ अशा फरकाने हार सहन करावी लागली. रविवारच्या लढतीत झालेल्या पराभवामुळे आता पाहुणा हिंदुस्थानी संघ पाच सामन्यांच्या हॉकी मालिकेत ०-१ अशा पिछाडीवर आहे.

न्यूझीलंडकडून जॉर्डन ग्रॅण्ट, ओलिविया मेरी, रशेल मॅकॅन, डिएना रिची यांनी दमदार गोल करीत हिंदुस्थानी संघावर वर्चस्व गाजवले. हिंदुस्थानकडून एकमेव गोल करण्यात आला. अनुपा बार्लाने ३१ व्या मिनिटाला गोल करीत थोडीशी झुंज दिली, पण इतर खेळाडूंना आपली चमक दाखवता आली नाही. आता उभय देशांमधील दुसरा सामना १६ मे रोजी होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या