नेटिझन्स बुचकळ्यात..! समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार

1005

न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार अ‍ॅमी सॅटर्थवेटन ही सध्या गर्भवती आहे. याचीच सध्या इंटरनेटवर चर्चा आहे. आता तुम्ही म्हणाल यात काय नवीन. पण अ‍ॅमी हिने संघातील सहकारी खेळाडू ली ताहूहू हिच्याशी समलैंगिक विवाह केला होता. याच कारणामुळे तिच्या गर्भारपणाची चर्चा सध्या नेटिझन्समध्ये रंगली आहे.

अ‍ॅमी हिने सोशल मीडियावर आपण गर्भवती असल्याची बातमी लहान मुलाच्या झबल्याच्या फोटोसह शेअर केली आहे. ‘2020 मध्ये आमच्या घरी लहान पाहुणा येणार आहे. ली आणि मी आम्हा दोघींनाही ही बातमी तुम्हाला सांगताना खूप आनंद होत आहे. मी माझा आनंद शब्दात व्यक्त करू शकत नाही’, असे कॅप्शन अॅमी हिने शेअर केलेल्या फोटोला दिले आहे. तिने ली हिचेही विशेष आभार मानले.

संघर्ष आणि विवाह
अ‍ॅमी आणि ली लग्नाआधी आठ वर्ष एकमेकांसोबत होते, मात्र कुटुंबीयांची परवानगी न मिळाल्याने त्यांना लवकर विवाह करता आला आहे. मात्र 2014मध्ये या दोघांचा साखरपुडा झाला होता आणि मार्च 2017 मध्ये दोघींनी निर्णय घेत विवाह केला.

मॅटरनिटी लिव्हही मिळणार
दरम्यान, न्यूझीलंड महिला संघाची कर्णधार अ‍ॅमी सॅटर्थवेटननं क्रिकेटमधून काही काळ विश्रांती घेतली आहे. यामागील कारण आत्ता स्पष्ट होत आहे. अ‍ॅमीनं ती गर्भवती असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे तिला न्यूझीलंडच्या नियमांनुसार मॅटरनिटी लिव्ह मिळणार आहे. न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने गर्भवती खेळाडूंसाठी मॅटरनिटी लिव्हची तरतूद केल्यानंतर याचा फायदा घेणारी अॅमी पहिली खेळाडू असणार आहे.

नेटिझन्स बुचकळ्यात…

आपली प्रतिक्रिया द्या