न्यूझीलंडचा कर्णधार वन-डे सामन्यातून बाद, वाचा कारण

4344
Kane Williamson

टीम इंडियाने दमदार कामगिरी करत टी-20 सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडच्या संघाला त्यांच्या घरच्या मैदानांवरच मात दिली. त्यामुळे टीम इंडियाचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढला आहे. त्यातच आता न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन देखील पहिल्या दोन वन-डे खेळणार नाही असे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे पराभूत झाल्याले न्यूझीलंड संघाला आणखी एक धक्का बसला आहे.

केन विल्यमसनचा खांदा दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे त्याला पहिल्या दोन वन-डे सामन्यांना मुकावे लागणार आहे. केन विल्यमसनच्या अभावी न्यूझीलंडचा संघ आणखी दबावाखाली असेल. तर दुसरीकडे टीम इंडिया मात्र दमदार कामगिरी करत आहे. त्यामुळे वन-डे सामन्यातही टी इंडियाच वरचढ ठरेल असं चित्र सध्या तरी पाहायला मिळतं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या