पाकिस्तानात राहणे म्हणजे तुरुंगात राहण्यासारखेच; न्यूझीलंडच्या माजी कसोटीपटू सायमंड डुलचा गौप्यस्फोट

 पाकिस्तान आपली मलिन प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी लाख प्रयत्न करोत, पण त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे कठीणच आहे. आता एक नवीन वाद समोर आलाय, ज्यात पाकिस्तानच्या अब्रूचे धिंडवडे चक्क न्यूझीलंडचा माजी कसोटीपटू आणि समालोचक सायमंड डुलने काढले आहेत. पाकिस्तानात राहणे तुरुंगात राहण्यासारखेच असल्याचा गौप्यस्फोट करून त्याने पाकिस्तानमधील वास्तव जगासमोर आणले आहे.

सायमंड डुलने काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमच्या स्ट्राइक रेटवर जोरदार टीका केली होती. या टीकेमुळे पाकिस्तानी सलामीवीर आमीर सोहैल आणि डुलमध्ये खूपच वाद झाले होते. तेव्हा मी पाकिस्तानातच होते आणि या गरमागरम वादविवादानंतर बाबरच्या चाहत्यांनी मला धमकी दिली. ज्यामुळे मला बाहेरच पडायला मिळाले नव्हते. मला मानसिकरीत्याही खूप त्रास दिला गेला होता. मला जेवायलाही मिळाले नव्हते. मग मी कसाबसा पाकिस्तानातून पळालो, अशी धक्कादायक माहिती डुल याने ‘जिओ न्यूज’ला दिली.

पाकिस्तानात राहणे हे तुरुंगात राहण्यासारखेच होते. मला कुठे बाहेर जाण्याचीही परवानगी नव्हती. कारण हॉटेलच्या बाहेर बाबर आझमचे चाहते माझी वाट बघत होते. त्यामुळे मी अनेक दिवस पाकिस्तानात अन्नपाण्याशिवाय राहिलो. तेव्हा मला प्रचंड मानसिक त्रास दिला गेला, पण देवाची कृपा होती म्हणून मी पाकिस्तानातून सहीसलामत माझ्या देशात पोहोचलो.

पीसीबीचे अध्यक्ष नजम सेठीच म्हणाले होते की, शाहीद आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली निवड समितीने बाबर आझमला कर्णधारपदावरून काढावे म्हणून प्रयत्न करत असल्याचे पीसीबी अध्यक्ष नजम सेठी यांनी सांगितले. मात्र त्याबाबत वर्तमान कामगिरीनंतरच निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले. बाबरला अफगाणविरुद्ध टी-20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती.

विराटवरही केली टीका

बाबरनंतर डुलने विराट कोहलीवरही टीका केली. कोहलीने लखनौविरुद्ध खेळताना 44 चेंडूंत 61 धावा केल्या होत्या. तेव्हा डुल म्हणाला, त्याने 42 ते 50 धावांचा टप्पा गाठण्यासाठी 10 चेंडू घेतले. त्याला त्याच्या वैयक्तिक विक्रमांचीच जास्त काळजी आहे. अशा खेळाडूला या खेळात स्थान नाही, असे मला वाटते.

आयपीएल गुणतालिका

संघ सा. वि.   प. ने. र.    गुण

राजस्थान  4    3  1    1.588   6

लखनौ 4 3 1    1.046 6

गुजरात  4 3    1  0.341   6

कोलकाता 3    2  1    1.375   4

       चेन्नई 4    2  2    0.225   4

पंजाब 4 2 2    -0.226      4          बंगळुरू   2    1    1    -1.256 2

मुंबई   3 1 2    -0.889      2          हैदराबाद      3    1    2    -1.502 2

दिल्ली 4 0 4    -1.578      0

टीप- सा-सामना, वि-विजय, प-पराजय,ऩे र.- नेट रनरेट

ही आकडेवारी गुजरात-पंजाबपर्यंतची आहे.

 अव्वल फलंदाज

फलंदाज सा. धावा     सरासरी 4    6

धवन  4 233  116.50     29  8          वॉर्नर     4    209 52.25   27 0

बटलर 4 204  61.00 20  8

ऋतुराज 4   197      65.66   10  14

शुभमन   4   183 45.75   21  4

 अव्वल गोलंदाज

गोलंदाज    सा.   वि. सरासरी 4 वि.    5 वि.

चहल  4 10 12.10     1    0

मार्क वूड    3 9 10.55   0    1

राशिद 4 9   13.33     0    0

अर्शदीप 4   7  17.00 0    0

जोसेफ 4 7   17.28     0    0