न्यूझीलंडचे ग्रेग बार्कले आयसीसीचे नवे चेअरमन, सिंगापूरचे इम्रान ख्वाजा 5-11 फरकाने पराभूत

आयसीसीच्या चेअरमनपदाच्या निवडणुकीत न्यूझीलंडच्या ग्रेग बार्पले यांनी बाजी मारली. ग्रेग बार्पले यांनी सिंगापूरच्या इम्रान ख्वाजा यांना 11-5 अशा फरकाने पराभूत करीत सर्वोच्च पदाचा मान मिळवला. हिंदुस्थानच्या शशांक मनोहर यांनी चेअरमनपदावरून माघार घेतल्यानंतर ग्रेग बार्पले हे आयसीसीचे नवे चेअरमन बनले आहेत. याआधी इम्रान ख्वाजा हे प्रभारी चेअरमन म्हणून कार्यरत होते.

– दक्षिण आफ्रिकन बोर्डाचे मत ठरले निर्णायक
ग्रेग बार्पले यांना हिंदुस्थान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया या क्रिकेटमधील सर्वच बाजूने बलाढय़ असलेल्या देशांचा सपोर्ट होता. तसेच इम्रान ख्वाजा यांना पाकिस्तान, सिंगापूर यांची मते मिळाली. दुसऱया फेरीत दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डाचे महत्त्वाचे मत ग्रेग बार्पले यांना मिळाले. त्यामुळे त्यांना दोनतृतीयांश मतांसह चेअरमनपदाच्या खुर्चीवर विराजमान होता आले.

– दोनतृतीयांश मते आणि दुसरी फेरी
ग्रेग बार्पले व इम्रान ख्वाजा यांच्यामधील चेअरमनपदाच्या निवडणुकीत पहिल्या फेरीनंतर न्यूझीलंडचे ग्रेग बार्पले यांना 10 तर इम्रान ख्वाजा यांना 6 मते मिळाली होती, मात्र चेअरमनपदासाठी एपूण मतांच्या दोनतृतीयांश मते मिळणे आवश्यक होती. पहिल्या फेरीत कोणालाही दोनतृतीयांश मते मिळाली नाहीत. त्यामुळे दुसऱया फेरीचा अवलंब करण्यात आला. या फेरीमध्ये ग्रेग बार्पले यांना 11 व इम्रान ख्वाजा यांना 5 मते मिळाली. अखेर ग्रेग बार्पले हे विजयी झाले.

आपली प्रतिक्रिया द्या