चुकीला माफी नाही! देशभरातून टीका झाल्यानं आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा

कोरोनामुक्त झाल्याची घोषणा झाल्यानंतर न्यूझीलंडमध्ये एकप्रकारची शिथिलता आली. नियम काटेकोरपणे पाळले नाहीत त्यामुळे न्यूझीलंडमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. काही दिवसांपूर्वी न्यूझीलंडमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये कोरोनाची प्रकरणे नोंदवली गेली. या क्वारंटाईन सेंटरच्या सुरक्षेत त्रुटी होत्या. या चुकांनंतर न्यूझीलंडचे आरोग्यमंत्री डेव्हिड क्लार्क यांनी राजीनामा दिला आहे.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, कोरोनासंदर्भात सरकारने दिलेली प्रतिक्रिया आणि लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल टीका झाल्यानंतर डेव्हिड क्लार्क यांनी राजीनामा दिला आहे. लॉकडाऊन दरम्यान ते कुटुंबासोबत समुद्रकिनारी फिरायला गेले होते. पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी गुरुवारी डेव्हिड क्लार्क यांचा राजीनामा घेतल्याचे जाहीर केले.

पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी यापूर्वी डेव्हिड क्लार्क यांना हटवण्यास नकार दिला होता. देशात कोरोना रोखण्यात डेव्हिड क्लार्क यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. मात्र, आता डेव्हिड क्लार्क यांच्या निर्णयाशी त्या सहमत असल्याचे पीएम जसिंडा आर्डर्न यांनी सांगितले. जेसिंडा आर्डर्न यांनी जूनच्या सुरुवातीला न्यूझीलंडला कोरोनामुक्त म्हणून घोषित केले.

न्यूझीलंडने कोरोमोनमुक्त घोषित केल्याच्या काही दिवसानंतर ब्रिटनहून परत आलेल्या दोन महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले. या दोन्ही महिलांना शिफारशीवरून विलगिकरण केंद्र सोडण्याची परवानगी देण्यात आली. नंतर दोघेही कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या. सध्या देशात कोरोनाची 22 सक्रिय प्रकरणे आहेत जी वेगवेगळ्या देशांतून आली आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या