न्यूझीलंडच्या खेळाडूची ‘संपलं’ म्हणत निवृत्तीची घोषणा

सामना प्रतिनिधी । मुंबई

न्यूझीलंडचा सलामीवीर रॉब निकोलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. रॉबने त्याच्या ट्विटर अकाउंटवर यांची घोषणा केली. रॉबने ट्विटरवर तो खेळलेल्या विविध क्लबच्या आणि न्यूझीलंड संघाच्या टोप्या एका दोरीवर लावलेला फोटो ट्विटरवर शेअर करत ‘संपलं’ असं लिहिलं आहे.

रॉबने न्यूझीलंडकडून २२ एकदिवसीय, २१ टी-२० आणि २ कसोटी सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यात त्याने ९४१ धावा केल्या असून त्यात २ शतकांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डीव्हिलियर्सनेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यावेळी त्याने आपण थकलो असल्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे म्हटले होते.

आपली प्रतिक्रिया द्या