खेळाडूनं सोडला ‘लॉलीपॉप’ झेल; फलंदाज, गोलंदाजालाही विश्वास बसला नाही

1908

‘कॅचेस विन मॅचेस’ असे क्रिकेटमध्ये सातत्याने म्हटले जाते. अनेकदा एका कॅचमुळे देखील सामन्याचे चित्र पालटले जाते हे आपण पाहिले आहे. मात्र कधी-कधी सोप्पा कॅचही हातातून सुटतो. असात एक प्रकार इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या कसोटी लढतीत घडला. या लढतीत खेळाडूने ‘लॉलीपॉप’ अर्थात सोपा कॅच सोडल्याने फलंदाज आणि गोलंदाजाही विश्वास बसला नाही. हा सर्व मजेशीर प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

इंग्लंड आणि न्यूझीलंड संघात हॅमिल्टन येथे दुसरा कसोटी सामना झाला. रॉस टेलर आणि केन विलियम्सन या दोघांच्या शतकी खेळीमुळे न्यूझीलंडला हा सामना अनिर्णित राखता आला नाही. या लढतीमध्ये एक असा प्रसंग दिसून आला ज्यामुळे ‘कॅचेस विन मॅचेस’ या टॅगलाईनचा अर्थ अधोरेखीत होतो. इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी मैदानावर तळ ठोकलेल्या टेलर अथवा केनची विकेट काढणे आवश्यक होते. मात्र जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर ज्यो डेन्ली याने क्रिकेटमधील सर्वात सोपा कॅच सोडला आणि इंग्लंडच्या हातातोंडाशी आलेली संधीही हुकली.

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याने सेट झालेली जोडी तोडण्यासाठी व्यूव्हरचना केली. त्याने केनला धिमा चेंडू टाकला. आर्चरच्या या जाळ्यात केन अडकला आणि त्याने टोलावलेला चेंडू मिड विकेटला उभ्या असणाऱ्या ज्यो डेन्लीकडे गेला. चेंडू थेट त्याच्या हातात आला. मात्र त्याने हा सोपा कॅच सोडला. परंतु एवढा सोपा कॅच ज्यो याने घेतला असेल असे वाटून आर्चरने सेलिब्रेशन देखील सुरू केलेले. मात्र कॅच सुटल्याचे त्याच्या लक्षात आले तेव्हा तो देखील हसू लागला.

आपली प्रतिक्रिया द्या