हॅटट्रिक! न्यूझीलंडच्या विजयाची अन् अफगाणिस्तानच्या पराभवाची

सामना ऑनलाईन । टाँटन

जेम्स निशाम व लॉकी फर्ग्युसन या वेगवान जोडगोळीच्या अफलातून गोलंदाजीनंतर कर्णधार केन विल्यम्सनच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विजयाची हॅटट्रिक साजरी केली. याचबरोबर अफगाणिस्तान संघालाही पराभवाची हॅटट्रिक सहन करावी लागली. अफगाणिस्तानचा निम्मा संघ गारद करणारा जेम्स निशाम सामन्याचा मानकरी ठरला.

अफगाणिस्तानकडून मिळालेले 173 धावांचे लक्ष्य न्यूझीलंडने 32.1 षटकांत 3 फलंदाजांच्या मोबदल्यात गाठले. अफताब आलमने पहिल्याच चेंडूवर मार्टिन गप्टीलला झेलबाद करून अफगाणिस्तानला सनसनाटी सुरुवात करून दिली होती. अफगाणिस्तानला जेम्स निशाम व लॉकी फर्ग्युसन यांनी 41.1 षटकांत 172 धावसंख्येवर रोखले.

धावफलक
अफगाणिस्तान : हजरतुल्लाह झझाई झे. मुन्रो गो. निशाम 34, नूर अली जदरान झे. लॅथम गो. फर्ग्युसन 31, रहमत शाह झे. गप्टील गो. निशाम 0, हश्मतुल्लाह शाहिदी झे. हेन्री गो. फर्ग्युसन 59.
एकूण : 41.1 षटकांत 172 धावा.
गोलंदाजी : लॉकी फर्ग्युसन 9.1-3-37-4, जेम्स निशाम 10-1-31-5.
न्यूझीलंड : कॉलिन मुन्रो झे. हमीद गो. अफताब 22, केन विलम्सन नाबाद 79, रॉस टेलर त्रि. गो. अफताब 48..
एकूण : 32.1 षटकांत 3 बाद 173 धावा.

आपली प्रतिक्रिया द्या