जन्मल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बाळाला आले दात, डॉक्टरही आश्चर्यचकित

सामना ऑनलाईन । बंगळुरू

साधारणत: जन्मल्यानंतर सहा महिन्यांनी बाळाला दात येण्यास सुरुवात होती. परंतु बंगळुरूमध्ये मात्र सर्वांनाच बुचकळ्यात टाकणारी घटना समोर आली आहे. येथे जन्मल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बाळाला दात आले आहे. या घटनेने डॉक्टरही आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी बाळाला भविष्यात कोणत्याही प्रकारच्या आव्हानाचा सामना करू लागू नये म्हणून शस्त्रक्रिया करून हे दात काढले.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, प्रदीप कुमार आणि पत्नी मधू चंद्रिका या दाम्पत्याला 3 एप्रिल, 2019 ला मुलगी झाली होती. जन्माच्या दुसऱ्याच दिवशी मुलीला दात आलेले पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो. आम्ही तिला डॉक्टरांकडे घेऊन गेलो आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने शस्त्रक्रिया करून आलेले दात काढून टाकले असे मुलीचे वडील प्रदीप यांनी सांगितले. गेल्या आठवड्यामध्ये शस्त्रक्रिया करून हे दात काढण्यात आले.

तीस हजारात एखादी घटना
डॉक्टरांनी याबाबत सांगितले की, तीस हजारांमध्ये एखादी अशी घटना घडते, मुलांच्या तुलनेत मुलींबाबत अशा घटना जास्त घडल्या. जन्मजात बाळाच्या तोंडामध्ये दात असल्याच दूध पाजताना आईला त्रास होण्याची शक्यता असते. तसेच बाळाच्या जीभेलाही अल्सरसारख्या आजारांचा धोका वाढतो. हार्मोन्सचे संतुलन बिघडल्यानंतर अशा घटना घडतात असेही डॉक्टर म्हणाले.