आणि बॉक्समधून निकाला सहा फूटाचा ‘सॅण्ड्रा’

सामना ऑनलाईन। लंडन

इंग्लडमधील न्यूकॅसल येथील पोलीस स्टेशनमध्ये बुधवारी दोन महिला एक भलामोठा बॉक्स घेऊन आल्या. याबॉक्समध्ये शस्त्र, बॉम्ब, मृतदेह नाहीतर कुठल्याशा वस्तू किंवा जुनाट फाईली असतील असे पोलिसांना वाटले. पण महिलांनी जेव्हा बॉक्स उघडला तेव्हा पोलिसांची भंबेरी उडाली. कारण त्यातून सहा फूटाचा सफेद रंगाचा साप निघाला होता. दिसायला आकर्षक असलेल्या या सापाचे पोलिसांनी तिथेच बारसे करुन टाकले. त्याचे ‘सॅण्ड्रा’ असे नाव ठेवण्यात आले.

sandra-2

न्यूकॅसल रस्त्यावरुन जाताना या महिलांना रस्त्याच्या बाजूला वेटोळे करुन बसलेला हा साप दिसला होता. एखादी भरधाव गाडी त्याच्यावरून जाईल असे या महिलांना वाटले. यामुळे या सापाला सुरक्षित स्थळी न्यावे म्हणून त्यांनी त्याला कसाबसा भल्यामोठ्या बॉक्समध्ये कोंबला. पण त्याच आता करायचं काय? त्याला न्यायचं कुठे असा प्रश्न त्या दोघींना पडला. शेवटी काहीच सुचत नसल्याने दोघींना त्याला पोलिसांच्या स्वाधीन करायचे ठरवले. त्यानंतर दोघी पोलीस स्टेशनमध्ये बॉक्ससह अवतरल्या. केव्हा एकदा या सापापासून सुटका होते असे त्यांना झाले होते. पण बॉक्सचे आकारमान बघून पोलिसांना भलताच संशय आला. यात शस्त्र, बॉम्ब, मृतदेह नाहीतर कुठल्याशा वस्तू किंवा जुनाट फाईली असतील असे त्यांना वाटले. पण जेव्हा बॉक्स उघडण्यात आला तेव्हा त्यात भलामोठा साप बघून पोलिसही क्षणभर हादरले. पण तो विषारी नसल्याचे कळताच पोलिस त्याच्याशी खेळू लागले. त्यांनी त्याचे ‘सॅण्ड्रा’ असे नाव ठेवले. अखेर सापाला सर्पमित्राच्या स्वाधीन करण्यात आले. त्यानंतर सगळ्यांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.

summary…newcastle-england-cops-receive-huge-parcel-at-police-station-and-find-6ft-albino-snake-inside