पतीने नवीन साडी घेऊन न दिल्याने नवविवाहित महिलेची आत्महत्या

84
suicide

सामना ऑनलाईन | अलीगढ

एका पतीने आपल्या पत्नीला नवीन साडी घेण्यास नकार दिला म्हणून पत्नीने रागाच्या भरात आत्महत्या केली आहे. उत्तर प्रदेशमधील अलीगढ मधील ही घटना असून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

पनेठी येथे राहणार्‍या अंजनाचे लग्न 13 मे रोजी सिद्धार्थ नगर येथील रहीवासी अमितशी झाले होते. त्या नंतर दोन महीन्यांनी 13 जुलै रोजी घरगुती कार्यक्रमासाठी अंजनाने आपल्या पतीकडे नवीन साडीची मागणी केली. परंतु अमितने त्यास नकार दिला. यावरून दोघांमध्ये वाद होऊन कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर अंजनाने टोकाचे पाऊल उचलत पंख्याला लटकून आत्महत्या केली.

याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व अंजनाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या