लग्नाच्या काही मिनिटानंतरच नवदाम्पत्य अपघातात ठार

1549

एकमेकांसोबत आयुष्यभर एकत्र राहण्याचे वचन देत लग्नबंधनात अडकलेल्या एका नवदाम्पत्याचा लग्नानंतरच काही मिनिटातंच अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेतील टेक्सास येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे.

हार्ले मोर्गन आणि रिआनॉन बोड्र्युक्स यांचा बुधवारी चर्चमध्ये विवाह पार पडला. हार्ले व रिआनॉन हे लहानपणीचे मित्र मैत्रिण तरुणपणी एकमेकांच्या प्रेमात पडले व त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. त्यांच्या चर्चमधील लग्नाला त्यांचे सर्व नातेवाईक हजर होते. चर्चमध्ये सर्वांदेखत लग्न झाल्यानंतर काही अंतरावरच असलेल्या एका हॉलमध्ये त्यांचे रिसेप्शन आयोजित करण्यात आले होते. नवरा नवरी एकाच गाडीने एकत्र त्या ठिकाणी जाण्यासाठी निघाले. हार्ले स्वत: गाडी चालवत होता व त्याची नववधू शेजारी बसली होती.  त्यांच्या नातेवाईकांनी उत्साहात त्यांना निरोप दिला. मात्र त्यावेळी दिलेला निरोप हा अखेरचा निरोप ठरेल असे कुणाला स्वप्नात देखील वाटले नसेल. चर्चच्या गेटवरून गाडी हॉलच्या दिशेने वळवत असताना मागून भरधाव येणाऱ्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना निरोप देत गाडी वळेपर्यंत तेथेच थांबलेल्या सर्व नातेवाईकांच्या डोळ्यासमोर हा जबरदस्त अपघात झाला त्यामुळे सर्वांनाच जबर धक्का बसला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या