मजबूत दात हवेत.. मग ‘विको वज्रदंती’ला पर्याय नाही!

दातांचे सौंदर्य आपले व्यक्तिमत्व निश्चितच प्रभावी बनवते. परंतु आरोग्याच्या दृष्टीने दात हा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे. तोंड हे पचनसंस्थेचे प्रवेशद्वार आहे. मुखाचे आरोग्य हे एकूणच आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.

दातांचा प्रमुख उपयोग अन्न चावण्यासाठी होतो. त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी दात आणि हिरड्या हे दोन्ही घटक महत्त्वाचे ठरतात. खराब झालेले दात, किडलेले दात, वेडेवाकडे दात, पुढे आलेले दात, हिरड्यांचे आजार यामुळे व्यक्ती त्रस्त होते.

ठणकणाऱ्या दाढेपुढे कोणतीही वेदना फिकीच वाटू लागते. आपण प्रत्येकाने हा अनुभव कधीतरी घेतला असेल. पण, दातांना निरोगी ठेवण्याचा एक उत्तम पर्याय आज आपल्याकडे उपलब्ध आहे, तो म्हणजे विको वज्रदंती.

संपूर्ण आयुर्वेदिक बेस असलेल्या या उत्पादनाने आज ग्राहकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. एक दोन नव्हे तर तब्बल 18 आयुर्वेदिक घटकांचा वापर यात केला गेला आहे. बाभूळ, जांभूळ, लवंग, मंजिष्ठा, दालचिनी, वज्रदंती, अक्रोड, बोर, खैर, बकुळ, ज्येष्ठमध, अनंतमूळ, त्रिफळा, अक्कलकाढा, ओवा, पतंग यासारख्या औषधी वनस्पतींचे मिश्रण विको वज्रदंतीमध्ये वापरले जाते.

दंतमंजन इतके प्रभावी असू शकते, यावर लोकांचा विश्वास विकोमुळे अढळ झाला आहे. नो साईड इफेक्ट्सची हमी देखील विको वज्रदंती आपल्या ग्राहकांना देते. याच्या वापराने दात आणि हिरड्यांचे आरोग्य सुधारण्यास खूप मदत झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या