…जेव्हा सचिनने चाहत्याला दिला ‘हा’ मोलाचा सल्ला

28
सामना ऑनलाईन । तिरूअनंतपुरम

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर नेहमीच आपल्या वेगळ्या स्टाईलसाठी ओळखला जातो. मग ते खेळाचे मैदान असो वा एखादे सामाजिक कार्य असो… सचिनने आपल्या फेसबुक पेज आणि ट्विटर हॅन्डलवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून यामध्ये सचिन तरूण दुचाकीवरुन प्रवास करत असलेल्या जोडप्यांना हेल्मेट घालण्याचा सल्ला देताना दिसत आहे.

सचिनने आपली गाडी थांबवून एका महिलेला सांगितले की, ‘ मागे बसला असाल तरीही हेल्मेट घाला. फक्त बाईक चालवणाऱ्यानेच हेल्मेट का घालावे? मागे बसणाऱ्या व्यक्तीनेही हेल्मेट घातले पाहिजे. एखाद्या दुर्घटनेमध्ये तुम्हालाही दुखापत होऊ शकते.’

व्हिडिओ पोस्ट करतानाही सचिनने ‘बाईकवर चालक किंवा त्याच्या मागे बसणारी व्यक्ति दोघांचाही जीव अनमोल आहे. कृपया हेल्मेट घालण्याची सवय करून घ्या. स्वतःच्या सुरक्षेसाठी हेल्मेट वापरा.’ असे आवाहन केले आहे.

या पोस्ट नंतर सचिनने अजून एक फोटो पोस्ट केला आहे. त्या फोटोमध्ये बाईकवर बसलेल्या जोडप्याने हेल्मेट घातले आहे.
आपली प्रतिक्रिया द्या