तृतीयपंथीयांना मिळणार घरे आणि निवृत्ती वेतन

13
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । अमरावती

तृतीयपंथी म्हणजे समाजातील एक दुर्लक्षित घटक. नेहमीच या समाजाकडे वेगळ्या नजरेने पाहण्यात येते. आंध्र प्रदेश सरकारने तृतीयपंथी लोकांसाठी अनेक कल्याणकारी योजनांची घोषणा केली असून त्या योजनांमध्ये तृतीयपंथी लोकांना प्रत्येक महिन्याला १००० रूपये निवृत्त वेतनसुध्दा दिले जाणार आहे.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या दोन दिवसांच्या संमेलनात तृतीयपंथी लोकांसाठी कल्याणकारी योजना राबवण्याचा निर्णय घेतला.

तृतीयपंथी लोकांना रेशन कार्ड आणि घरे देण्याची तसेच त्यांना रोजगार मिळवून देणारी योजना आंध्र प्रदेश सरकार राबवणार आहे. तृतीयपंथीयांना स्वाभिमानाने आयुष्य जगणे सोपे व्हावे यासाठी कल्याणकारी योजना राबवण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या