‘न्यूटन’चा वर्ल्ड प्रिमिअर बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये

1

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेता राजकुमार राव याच्या आगामी ‘न्यूटन’ या चित्रपटाचा वर्ल्ड प्रिमिअर या वर्षाच्या बर्लिन आंतरराष्ट्रिय फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार आहे. राजकुमारने स्वत: ट्विटरवरुन ही माहिती दिली.

”न्यूटन’ या माझ्या आगामी चित्रपटाचे वर्ल्ड प्रिमिअर बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार आहे. आम्ही सर्व जण खुप खुष आहोत. या चित्रपटासाठी आम्ही खूप मेहनत घेतली आहे. त्यामुळे हा चित्रपट नक्कीच सर्वांना आवडेल.’ असे राजकुमारने ट्विट केले आहे. ‘न्यूटन’ या चित्रपटात राजकुमार राव व पंकज त्रिपाठी यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर अमित मसुरकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.