सावधान! साथरोग ‘X’ धडकणार; 50 दशलक्ष लोकांचा बळी जाण्याची शक्यता, तज्ज्ञांची माहिती

फाईल फोटो

जगभरातील आरोग्य तज्ज्ञांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे की, ‘कोविड-19 भविष्यात अधिक विनाशकारी साथीच्या रोगांचा फक्त एक पूर्वसूचक असू शकतो’. जागतिक स्तरावरील इंग्रजी वृत्तपत्र डेली मेलनं या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

यूकेच्या लसीकरण टास्कफोर्सचे अध्यक्ष असलेल्या डेम केट बिंघम यांनी, ‘पुढील साथरोग कमीतकमी 50 दशलक्ष लोकांचा बळी घेऊ शकते असा गंभीर इशारा दिला आहे. तसंच जगाचं भाग्य होतं की कोविड -19 अधिक प्राणघातक नव्हता, असंही त्यांनी म्हटलं आहे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं (डब्ल्यूएचओ) अपेक्षित पुढील साथरोगाला ‘डिसीज एक्स’ असं संबोधलं आहे, असं म्हटलं आहे की ते आधीच ‘मार्गावर’ आहे.

WHO च्या आकडेवारीनुसार 2019 मध्ये उद्भवलेल्या कोविड-19 नं आधीच जागतिक स्तरावर सुमारे सात दशलक्ष लोकांचा बळी घेतला आहे.