नगरोटा दहशतवादी हल्ल्याप्रकरणी जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याला अटक

104

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

नगरोटा येथीव लष्करी तळावर हल्ला करणाऱ्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्याला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केली आहे. सईद मुनीर-उल-हसन कादरी असं अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचं नाव असून तो कश्मीरच्या कुपवाड्याचा रहिवासी आहे. २९ नोव्हेंबर २०१६ मध्ये नगरोटा लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील तो मुख्य आरोपी आहे.

नगरोटा लष्करी तळावर करण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये सात जवान शहीद झाले होते. तर तीन जवान गंभीररीत्या जखमी झाले होते. या हल्ल्याच्यावेळी तीन दहशतवाद्यांचाही खात्मा करण्यात आला होता. या हल्ल्यानंतर जैश ए मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. हल्ल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्याची जबाबदारी एनआयएवर सोपवण्यात आली होती. शनिवारी एनआयएने सापळा रचून सईद मुनीर-उल-हसन कादरी याला अटक केली. सईदच्या अटकेनंतर त्याने दिलेल्या माहितीने हा हल्ला जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने केल्याचे स्पष्ट झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या