इसिसच्या संशयावरून एनआयएने दोघांना घेतले ताब्यात

इसिस या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एन आय ए) फुलेनगर येरवडा आणि कोंढवा येथून एका महिलेसह दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या कॉलमध्ये काही संशयित फोन टॅप करण्यात आले असल्याची माहिती तपास यंत्रणेला मिळाली होती. त्यामुळे त्यांचा इसिसची संबंध असल्याचा संशय तपास यंत्रणेला आला. या कारवाईसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने विश्रांतवाडी पोलिसांची मदत घेतली. दोघाकडे प्राथमिक चौकशी सुरू आहे. याप्रकरणी स्टेशन डायरीत नोंद करण्यात आली आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणा दिल्ली आणि मुंबई यांच्यासह महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने पुण्यातील येरवडा येथून सादीया अन्वर शेख आणि कोंढवा येथून नबील सिद्धीकी खत्री यांना ताब्यात घेतले आहे. इस्लामिक स्टेट ऑफ इराक ही संघटना दक्षिण आशिया आणि मध्यवर्ती आशिया याठिकाणी कार्यरत आहे. या संघटनेने एका बॉम्बस्फोट प्रकरणी जबाबदारी स्वीकारली होती. त्यानुसार राष्ट्रीय तपास यंत्रणेने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, दोघांचीही तपास यंत्रणेकडून कसून चौकशी सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यानी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या