परमबीर, प्रदीप शर्मा यांची एनआयएकडून चौकशी

अॅण्टेलिया स्फोटक प्रकरणात एनआयएने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा जबाब नोंदवून घेतला. तर निवृत्त पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांची एनआयएने कसून चौकशी केली.

बुधवारी सकाळी 9.30 च्या सुमारास परमबीर सिंग एनआयएच्या कार्यालयात पोहचले. त्यानंतर दोन तास त्यांच्याकडे  अॅण्टेलिया स्फोटक कारप्रकरणी विचारणा करून त्यांचा रीतसर जबाब नोंदवण्यात आला. त्यानंतर प्रदीप शर्मा यांचीदेखील एनआयएच्या अधिकाऱयांनी अॅण्टेलिया प्रकरणात कसून चौकशी केली. याच प्रकरणात मंगळवारी रात्री मुंबई पोलीस दलातील एका उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱयाची चौकशी करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या