कर्नाटकात NIA चे छापे; प्रतिबंधित PFI शी संबंधित 16 ठिकाणांवर तपास

दहशतवादी फंडिंग प्रकरणी सुरू असलेल्या तपासासंदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणेने एकाच वेळी दक्षिण कन्नडमध्ये 16 ठिकाणी छापे टाकले. या मालमत्ता बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या कार्यकर्त्यांच्या आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बंटवाल, उप्पिनगडी, वेणूर आणि बेलथनगडी येथे ही तपासमोहीम राबवण्यात आली. या ठिकाणांमध्ये काही घरे, दुकाने आणि हॉस्पिटलचा समावेश आहे. पैशांच्या व्यवहाराबाबतचे सर्व पुरावे गोळा केले जात असल्याची माहिती मिळत आहे.

पहाटे 4.30 च्या सुमारास स्थानिक पोलिसांच्या मदतीने छापे टाकण्यात आल्याचेही कळते.

काही दिवसांपूर्वीच एनआयएच्या तपास पथकांनी बंटवाल आणि पुत्तूर येथे काही ठिकाणी छापे टाकून पाच जणांना ताब्यात घेतले होते.