IPL 2020 केवळ अशक्य! झेप घेत षटकार अडवला, सचिननेही ट्विट केला फोटो

nicholas-pooran-stunning-effort-on-boundary

आयपीएलचा 13 वा सीझन चांगलाच गाजतो आहे. किंग्ज इलेवन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात शारजाह येथे झालेल्या सामन्यात फिल्डिंगचा उत्कृष्ट नमूना पाहायला मिळाला. अशक्य अशी झेप घेत षटकार वाचवणाऱ्या निकोलस पूरनच्या फिल्डिंगचे कौतुक होत आहे.

माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने देखील यावर ट्विट केले आहे. ‘माझ्या आयुष्यात पाहिलेले सर्वात चांगले क्षेत्ररक्षण. खरोखरच अविश्वसनीय.’ असे सचिनने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

sachin-twit

किंग्ज इलेवन पंजाबचा गोलंदाज मुरुगन अश्विनने टाकलेला चेंडू स्ट्राइकवर असलेला राजस्थान रॉयल्सचा फलंदाज संजू सॅमसनने टोलवला. षटकार नक्की असे वाटत असतानाच निकोलस पूरन याने अविश्वसनीय अशी झेप घेतली. चेंडू हवेतच पकडून बाहेर ढकलला. राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांनी धावत 2 धावा केल्या. मात्र पूरनच्या अप्रतिम फिल्डिंगमुळे चार धावा वाचवण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या