वाढदिवस साजरा करताना तुम्हीही ‘या’ अभिनेत्रीसारखी चूक करू नका, जिवावर बेतू शकते

वाढदिवस म्हटले की केक आणि त्यावर भरसाठ मेनबत्त्या हे जणू आता समिकरणच झाले आहे. परंतु मेनबत्तीला फुंकर मारताना काळजी घेतली नाही ते जिवावरही बेतू शकते. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हॉलिवूड अभिनेत्री आणि टीव्हीवरील सेलिब्रिटी निकोल रिची ही थोडक्यात बचावली आहे.

निकोल रिची हिने नुकताच आपला 40 वा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला. मात्र वाढदिवस साजरा करताना निकोल रिची हिच्या केसांना आग लागते. मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळते. याचा व्हिडीओ व्हायरल होत असून वाढदिवस साजरा करताना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

निकोल आपल्या वाढदिवसाच्या केकवर लावण्याच आलेल्या मेनबत्त्यांना फुंकर मारत होती. त्यावेळी तिचे सोनेरी केस मोकळे सोडलेले होते. मात्र मेनबत्त्यांवर फुंकर मारताना तिचे केस त्यावर येतात आणि केसांना आग लागली. यामुळे निकोल आरडाओरडा करू लागले. वाढदिवसाला उपस्थित मित्र ही आग विझवतात, त्यामुळे मोठा अनर्थ टळतो. निकोल हिने आपल्या इन्स्टाग्रामवर अकाउंटवर या प्रसंगाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

दरम्यान, निकोल रिची हिच्या या व्हिडीओवर चाहत्यांसह सेलिब्रिटींनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अनेकांनी तिला काळजी घेण्याचे आवाहन केले.

आपली प्रतिक्रिया द्या