6 गर्भवती महिलांसोबत तरुण पोहोचला मित्राच्या लग्नात; म्हणतोय, मीच मुलांचा बाप!

आफ्रिका खंडातील नायजेरिया हा देश नैसर्गिक साधनसंपत्ती आणि निसर्गसौंदर्यासाठी ओळखला जातो. पण, सध्या या देशाची चर्चा एका भलत्याच कारणासाठी होत आहे. इथे एका लग्न समारंभात एक तरुण सहा गर्भवती महिलांसोबत पाहुणा म्हणून दाखल झाला आहे.

मित्राच्या लग्नात प्ले बॉयचीच हवा!

या नायजेरियन प्ले बॉयचं नाव प्रीटी माईक असं आहे. प्रीटी नुकताच त्याच्या मित्राच्या लग्नात पाहुणा म्हणून गेला होता. पण, जाताना त्याच्यासोबत सहा गर्भवती महिला होत्या. या सगळ्या महिलांनी एकाच रंगाचे कपडे परिधान केले होते. प्रीटी स्वतः देखील नटून थटून या समारंभात दाखल झाला होता.

त्याच्यासोबत असलेल्या सहा गर्भवती महिलांमुळे लग्न समारंभात त्याचीच चर्चा सुरू झाली. एरवी लग्नात गप्पांचा केंद्रबिंदू नवपरिणित जोडी असते. पण, इथे मात्र प्रीटी आणि त्याच्यासोबत असलेल्या महिलांविषयीच चर्चा रंगली होती. या चर्चेला कारणही तसंच होतं.

सहा महिलांशी एकाच मंडपात विवाह

या सहाही महिला प्रीटीच्या पत्नी आहेत. प्रीटीने गेल्या वर्षी त्या सहाही जणींशी एकाच दिवशी एकाच मांडवात लग्न केलं होतं. या सहाजणींपैकी दोघी त्याच्या माजी प्रेयसी असून उर्वरित चौघींशी त्याचे प्रेमसंबंध होते. आता तो सहा बाळांचा पिता बनणार आहे.

पण, चर्चेत यायची प्रीटीची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही 2017मध्ये महिलांचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्याच्या कारणावरून त्याला अटक करण्यात आली होती.

आपली प्रतिक्रिया द्या