मुंबईत रात्र बाजारपेठ

55

अंगात कला भरपूर असूनही काहीजणांना व्यासपीठ मिळत नाही. म्हणूनच मुंबई शॉपिंग फेस्टीवल अंतर्गत रात्र बाजारपेठ हा नवा उपक्रम सध्या राबवण्यात येतोय. ‘टॅलेंट स्ट्रीट काळा घोडा’ हा महाराष्ट्र पर्यटन किकास महामंडळ आणि मुंबई महानगरपालिका यांनी संयुक्तपणे सुरू केलेला उपक्रम असून या माध्यमातून शहरातील उदयोन्मुख कलाकारांना आपल्या कलेचे प्रदर्शन करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते.

ही रात्र बाजारपेठ १९ आणि २० जानेवारी रोजी मालाडच्या इनऑरबिट मॉलमध्ये भरणार असून त्यानंतर २६ आणि २७ जानेकारी रोजी पवई येथे ती भरेल. वरळी येथे १३ आणि १४ जानेवारीला पार पडलेल्या रात्र बाजारपेठेत ‘टॅलेंट स्ट्रीट काळा घोडा’चे कलाकार सहभागी झाले होते. दर रविवारी सरासरी ५००० ते ७००० चाहते या ठिकाणी भेट देतात आणि या उपक्रमाचे यश पाहता या शहरात आणि ठाणे, नकी मुंबई येथेही अशा प्रकारच्या रात्र बाजारपेठा भरवण्याचा एमटीडीसीचा विचार आहे. रात्र बाजारपेठेव्यतिरिक्त त्या ठिकाणी वैविध्यपूर्ण कार्यक्रम ही आयोजित केले आहेत.

रात्रीची धम्माल
वीकएण्डला मुंबईतील तीन ठिकाणी या रात्र बाजारपेठा तयार करण्यात आल्या आहेत. सायंकाळी ४ ते पहाटे ४ या वेळेत या रात्र बाजाराची धमाल पाहायला मिळेल. या बाजारपेठेत अर्कचित्रे, शिल्पकला, मातीच्या वस्तू, वारली चित्रकला, दागिने, पपेट मेकिंग, जादूचे खेळ आणि बॉलीवूडसाठी ऑडिशन अशा अनेक प्रकारात लोकांचे कलागुण पाहाता येतील. त्यांनी बनविलेल्या आकर्षक वस्तू खरेदीही करता येणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या