अबब..! केसांची लांबी 6 फूट 3 इंच, हिंदुस्थानी तरुणीची गिनीज बुकात नोंद

1221

महिलांचे सौंदर्य हे त्यांच्या केसात असते असे म्हटले जाते. केस हा प्रत्येक महिलांचा जिव्हाळ्याचा विषय. आपले केस लांबसडक असावे अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते. आता तुम्ही म्हणाल हे एवढे गुऱ्हाळ लावण्याचे कारण काय. तर हे सर्व याचसाठी की हिंदुस्थानची 27 वर्षीय तरुणी नीलांशी पटेल हिची जगातील सर्वात लांब केस असणारी महिला म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.

nilanshi-2

गुजरातमधील मोडासा येथील रहिवासी असणाऱ्या नीलांशीच्या केसांची लांबी तब्बल 6 फूट तीन इंच एवढी आहे. नीलांशीने गेल्या 11 वर्षांमध्ये एकदाही केस कापलेले नाहीत अथवा ट्रिमिंगही केलेले नाही. वयाच्या सहाव्या वर्षापासून तीने केस न कापण्याची भीष्मप्रतिज्ञा केली होती आणि आता तिला याचे फळ गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होऊन मिळाले आहे.

nilanshi-1

नीलांशी हिचा जन्म 6 ऑगस्ट 2002 मध्ये झाला. लहानपणापासून केसांची काळजी घेणाऱ्या नीलांशीने वयाच्या सहाव्या वर्षी आता यापुढे केस कापणार नाही असे ठरवले. नोव्हेंबर 2018 मध्येही तिच्या नावाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली होती. इटली येथील एका कार्यक्रमादरम्यान तिच्या केसांची लांबी 5 फूट 7 इंच भरली होती. त्यावेळी तिने अर्जेंटिनाच्या एका तरुणीला विक्रम मोडला होता.

nilanshi-3

सप्टेंबर 2019 मध्ये पुन्हा एकदा नीलांशीच्या केसांची लांबी मोजण्यात आली तेव्हा तिने आपलाच जुना विक्रम मोडला. यावेळी तिच्या केसांची लांबी 6 फूट 3 इंच भरली. गुजरातच्या मोडासा येथील सायरा गावची रविहासी असणाऱ्या नीलांशीचे वडील ब्रिजेश पटेल शिक्षक असून आई कामिनीबेन देवी हाऊसवाईफ आहेत. पटेल दाम्पत्याची ही एकुलती एक मुलगी असून ती सध्या बारावीत शिक्षण घेते.

nilanshi-4

लहान असताना हेअरड्रेसने तिचे केस व्यवस्थीत न कापल्याने तिने यापुढे केस कापणार नाही असा निश्चय केला. आता तर तिचे केस तिच्या उंचीपेक्षाही लांब झाले आहेत. त्यामुळे तिला उंच टाचांच्या सँडल घालाव्या लागतात. अनेकदा लोक तिच्यासोबत सेल्फीही घेतात, त्यामुळे आपल्याला सेलिब्रिटी झाल्यासारखे वाटते असेही तिने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या