तरुण कलाकार किती वर्षे टिकतील हा प्रश्न

सामना प्रतिनिधी । पुणे

मनोरंजन क्षेत्रातील वाढता ताण स्वीकारणे ही काळाची गरज बनली आहे. मात्र, यामुळेच ही नवी पिढी आमच्याप्रमाणे या क्षेत्रात पुढे काही वर्षे टिकेल का हा प्रश्नही मला अनेकदा पडतो. त्यांनी करियर ऑप्शन म्हणूनच हे क्षेत्र निवडले आहे, त्यामुळे या क्षेत्राकडे पाहायची त्यांची दृष्टीही वेगळी आहे. मात्र, असे असले तरी या ओघाने त्यांना येणारे ताण हेदेखील वेगळे आहेत, असे मत ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

नीना कुलकर्णी म्हणाल्या, आम्ही ज्या काळात चित्रपटसृष्टीत आलो त्या काळी आम्ही करीत असलेले काम हे अभ्यासाव्यतिरिक्त केवळ छंद होते. मात्र, आमचा हा छंद आजच्या पिढीसाठी एक ‘करियर ऑप्शन’ आहे आणि त्याचमुळे आजच्या तरुण कलाकारांसमोरील आव्हाने हीदेखील वेगवेगळी आहेत.

‘आयाम’, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि आशय फिल्म क्लबतर्फे महिला चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन नीना कुलकर्णी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. लेखिका आदिती मोघे, यूएसके फाऊंडेशनच्या संस्थापिका डॉ. उषा काकडे, मनस्विनी प्रभुणे, प्राची बारी, मेधा शिंपी, अपर्णा देगावकर, स्वाती जरांडे, सतीश जकातदार आणि चित्रपट संग्रहालयाचे प्रकाश मगदूम उपस्थित होते.

‘आयाम महिला पत्रकार’ पुरस्कार यावर्षी देश-विदेशात भ्रमंती करून त्यावर प्रवासी ब्लॉग लिहिणाऱ्या रितू हरीश गोयल यांना नीना कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मनस्विनी प्रभुणे यांनी प्रास्ताविक केले. सुप्रिया चित्राव यांनी सूत्रसंचालन केले.

ह्या महिला चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन नीना कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. आदिती मोघे, डॉ. उषा काकडे, मनस्विनी प्रभुणे, प्राची बारी, मेधा शिंपी, अपर्णा देगावकर उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या