भयंकर! नऊ महिन्यांच्या मुलीवर काकाकडून बलात्कार

1427
फोटो प्रातिनिधिक

देशभरात महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्याचं चित्र आहे. त्यात पश्चिम बंगालमध्ये एक भयंकर घटना उघड झाली आहे. एका नऊ महिन्यांच्या तान्हुलीवर तिच्या काकानेच बलात्कार केला आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, अनूप प्रामाणिक असं या आरोपीचं नाव आहे. अनूप पीडितेच्या शेजारीच राहतो. बुधवारी तो तिला घेऊन बाहेर गेला होता. तिच्यासाठी खेळणी घेऊन येतो, असं सांगून तो तिला बाहेर घेऊन गेला. जेव्हा तो तिला परत घेऊन आला, तेव्हा तिच्या कुटुंबीयांनी तिला रक्तस्राव होत असल्याचं पाहिलं. त्यांनी त्वरित पोलिसात धाव घेतली.

कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीवरून अनूपला अटक करण्यात आली. त्याच्यावर पोक्सो तसेच अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत असून मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या