फरार हिरे व्यापारी नीरव मोदीभोवती प्रत्यार्पणाचा फास घट्ट होतोय!

हिंदुस्थानातील पंजाब नॅशनल बँकेसह अन्य बँकांना 11,300 कोटी रुपयांचा चुना लावून इंग्लंडमध्ये पळालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या प्रत्यार्पण खटल्याची सुनावणी आजपासून लंडनच्या वेस्टमिन्स्टर कोर्टात सुरू झाली. पाच दिवस चालणाऱ्या या सुनावणीत न्यायालय मोदी खरेच आर्थिक घोटाळा आणि मनी लॉंड्रीन्ग प्रकरणात सहभागी आहे याची खातरजमा लंडनचे हे न्यायालय करणार आहे. शुक्रवारी संपणाऱया या सुनावणीनंतर नीरव मोदींचे हिंदुस्थानला प्रत्यार्पण कधी होणार हे स्पष्ट होणार आहे. मोदीच्या वकिलाने ही सुनावणी इन कॅमेरा असावी अशी मागणी न्यायालयाकडे केली आहे.

फरार हिरेव्यापारी नीरव मोदी यांने पंजाब नॅशनल बँकेकडून 11,300 कोटी रुपयांची कर्जे घेत त्यांची परतफेड केली नाही. या घोटाळ्यानंतर नीरव लंडनला फरार झाला. त्यामुळे सीबीआय आणि ईडीने प्रत्यार्पणासाठी दोन वेगळे विनंती अर्ज ब्रिटिश सरकारकडे पाठवले आहेत. मार्च 2019 पासून लंडनच्या वान्ड्सवर्थ तुरुंगात बंद असलेल्या मोदीचा जामीनअर्ज न्यायालयाने 5 वेळा फेटाळला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या