फोर्ब्सची यादी जाहीर, नीरव मोदीला मोठा झटका

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

फोर्ब्सने जगभरातील श्रीमंत व्यक्तींची यादी जारी केली आहे. श्रीमंतांच्या यादी पुन्हा एकदा अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस जगातील सर्वातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहे. पीएनबी घोटाळेबाज नीरव मोदीला यामध्ये सर्वात मोठ झटका बसला आहे. पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यानंतर नीरव मोदीचं नाव फोर्ब्सच्या यादीतून हटवण्यात आलं आहे.

फोर्ब्सने जारी केलेल्या २००० श्रीमंत लोकांच्या यादीत नीरव मोदीला स्थान नाही. नीरव मोदीच्या संपत्ती जवळपास ९४ टक्के घसरण झाली आहे. गेल्या वर्षीच्या यादीत नीरव मोदीचा टॉप १०० श्रीमंत हिंदुस्थानींच्या यादीत समावेश होता. त्याची संपत्ती त्यावेळी एकूण संपत्ती १.८ बिलियन डॉलर (११,६०० कोटी) होती. पंजाब नॅशनल बँकेंच्या घोटाळ्याच्या रकमेएवढीच मोदीची संपत्ती होती.

अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस ११२ मिलियन डॉलरसह पहिल्या स्थानावर आहेत. मायक्रोसॉफ्टचे मालक बिल गेट्स ९० बिलियन डॉलरसह दुसऱ्या स्थानावर आहेत तर बर्कशायर हाथवेचे सीईओ वॉरन बफेट तिसऱ्या स्थानवर असून त्यांची एकूण संपत्ती ८७ बिलियन डॉलर आहे.