नीरव मोदीचा तुरुंगातील मुक्काम वाढला, जामीन अर्ज फेटाळला

351

पंजाब नॅशनल बँकेत चौदा हजार कोटींचा घोटाळा करून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याचा जामीन अर्ज लंडनमधील वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट न्यायालयाने फेटाळला आहे. नीरव मोदीच्या कोठडीत न्यायालयाने 17 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे.

नीरव मोदी याला मार्च महिन्यात अटक करण्यात आली आहे. तेव्हापासून तो लंडनमधील वांड्सवर्थ तुरुंगात कैद आहे. गुरुवारी वेस्टमिन्स्टर न्यायालयातील सुनावणीला तो तुरुंगातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर होता. मात्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळत त्याच्या कोठडीत 17 ऑक्टोबर पर्यंत वाढ केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या