‘निर्भया’च्या दोषींना शेवटच्या इच्छेसोबत विचारण्यात आले काही प्रश्न

3619
nirbhaya convicts

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशी देण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. तिहार तुरुंग प्रशासनाने गुन्हगारांना नोटीस धाडली असून त्यांची शेवटची इच्छा विचारली आहे. तुरुंग प्रशासनाने गुन्हगारांना अन्य प्रश्न देखील विचारले आहेत. फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या कैद्यांसंदर्भात काही निश्चित प्रक्रिया तुरुंग प्रशासनाला पूर्ण करणे गरजेच्या असतात. अशा कैद्यांची शेवटी इच्छा विचारली जाते आणि ती पूर्ण करण्यात येते.

दोषी गुन्हेगारांना तुरुंग प्रशासनाकडून विचारण्यात आले आहे की, 1 फेब्रुवारी रोजी फासावर जाण्याआधी ते कुणाची भेट घेऊ इच्छितात? त्यांच्या नावावरची मालमत्ता किंवा बँक खात्यातील रक्कम ते कोणाच्या नावावर करू इच्छितात? कुणाला नॉमिनी म्हणजे वारसदार जाहीर करणार आहेत का? मृत्यूपत्र करणार आहेत का? कोणतं धार्मिक किंवा आवडतं पुस्तक वाचू इच्छित आहात का?, असे प्रश्न दोषींना विचारण्यात आले आहेत.

2012 साली झालेल्या निर्भया प्रकरणातला महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. निर्भयाचा दोषी पवन कुमार गुप्ता याची विशेष याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. 2012मध्ये निर्भया प्रकरण घडले तेव्हा आपण अल्पवयीन होतो. मात्र दिल्ली उच्च न्यायालयाने निकाल देतेवेळी या बाजूकडे दुर्लक्ष केले होते, असा दावा पवनने केला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने यावर सुनावणी करताना दाखल केलेल्या याचिकेत कोणतीही नवीन तथ्य नसल्याचे स्पष्ट करत फाशीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या