#Nirbhaya दोषींच्या वकिलांना दिल्ली बार काउन्सिलची नोटीस

1168

निर्भयाच्या दोषींचे वकील ए. पी. सिंह यांना दिल्ली बार काउन्सिलने नोटीस पाठवली आहे. या नोटिशीचं उत्तर पुढील दोन आठवड्यात देणं बंधनकारक असणार आहे.

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी पवन कुमार गुप्ता याने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. डिसेंबर 2012 रोजी ही घटना घडली, तेव्हा आपण अल्पवयीन होतो, असा दावा पवनने केला होता. या घटनेनंतर ऑसिफिकेशन टेस्ट (हाडांच्या घनतेची चाचणी) झाली नव्हती आणि या गोष्टीचा फायदा मिळायला हवा, असे आरोपीने म्हटले होते. त्याची ही याचिका 19 डिसेंबर रोजी न्यायालयाने फेटाळली होती.

या याचिकेच्या सुनावणीनंतर न्यायालयाची दिशाभूल करून न्यायप्रक्रियेला विलंब लावल्याप्रकरणी दिल्ली बार काउन्सिलने पवनचे वकील एपी सिंह यांच्यावर कारवाई करण्याचे आदेशही उच्च न्यायालयाने दिले होते. सिंह यांना 25 हजारांचा दंडही ठोठावण्यात आला होता. कोर्टाने त्यांना हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, सिंह कोर्टासमोर हजर झाले नाहीत. त्यामुळे बार काउन्सिलने सिंह यांना नोटीस पाठवली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या