#Nirbhayagangrape : आम्ही जल्लादाचे काम करायला तयार, जगभरातून तुरुंग प्रशासनाला पत्र

809
nirbhaya convicts

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना 16 डिसेंबरला फासावर लटकवण्यात येणार असल्याची शक्यता आहे. त्यासाठी तिहार तुरुंगात ट्रायल देखील झाल्याचे समजते. त्यामुळे त्या नराधमांना फासावर लटकविण्यासाठी जल्लादाचे काम करण्यासाठी अनेक जण पुढे सरसावले आहेत. तिहार तुरुंग प्रशासनाला जगभरातून पत्रं येत असल्याचे समजते.

निर्भया सामूहिक बलात्कार – सर्व दोषींना 16 डिसेंबरला फाशी?

हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, तिहार तुरुंग प्रशासनाला मुंबई, अहमदाबाद, तामिळनाडू, केरळ, गुरुग्राम, दिल्ली तसेच लंडन व अमेरिकेवरून लोकांची पत्रं आली आहेत. एकून 15 जणांनी या प्रकरणातील दोषींना फासावर लटकविण्यासाठी जल्लादाचे काम करण्याची तयारी दर्शविली आहे. यातील दोन जण हे लंडनचे असून एक अमेरिकेतील नागरिक आहे. मात्र तुरुंग प्रशासनाने त्यांची मागणी फेटाळली असून जल्लादाचे काम करण्यासाठी बाहेरील व्यक्तीची गरज नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

दिल्लीच्या हवेने मरतोच आहोत, आणखी फाशी कशाला? निर्भयाच्या दोषीची सुप्रीम कोर्टाकडे पुनर्विचार याचिका

येत्या 16 डिसेंबरला निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणाला सात वर्ष पूर्ण होत आहेत. नुकत्याच झालेल्या हैदराबाद बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या एन्काऊंटरनंतर निर्भयाचे दोषी पवन गुप्ता, अक्षय ठाकूर, विनय शर्मा, मुकेश सिंग यांना फासावर लटकवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या